पाळंमुळं -एक अस्सल ग्रामीण निवेदन
मेधा वैजापूरकर
१२ फेब्रुवारी २०२६
पाळंमुळं ही एका संवेदनशील, समाजभान सांभाळत संघर्षाबरोबरच आपली जीवनमूल्ये जोपासणाऱ्या एका अभियंत्याची आत्मकथा आहे. ह्या आत्मकथनाला जसा मातीचा अस्सल वास आहे तसाच ग्रामीण भागातील गावकीचा, भावकीचा बाज आहे. या कथनात जशी कौटुंबिक स्तरावरील घट्ट नात्यांची, आजीच्या ऊबदार वात्सल्याची, जिव्हाळ्याची आणि तिने केलेल्या संस्कारांची पाठराखण आहे, तशीच बापाने कष्टाने पेरलेल्या काळ्याशार मातीतून ऊगवणाऱ्या हिरव्या…